सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उदंड प्रतिसाद

0
71

सिंधुदुर्ग, दि.११ : सैनिक स्कूल, आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला या स्पर्धेला सांगली, सातारा , कोल्हापूर, नाशिक, मुंबई, रत्नागिरी, दापोली, गडहिंग्लज अशा विविध राज्य भरातून चारशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेची सुरवात जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथून करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रगीत गायन करण्यात आले. सैनिक स्कूल कॅडेट अनुराग बागडी याने शहिद जवानांवर कविता सादर केली. यानंतर महाराष्ट्र गीतगायन करण्यात आले. खड्या आवाजात देण्यात आलेल्या शिवगर्जनेने स्पर्धकांमध्ये जोश संचारला. सदर स्पर्धा सैनिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत पी. एफ. डाॅन्टस यांच्या पुण्य स्मृतींस समर्पित करण्यात आली.

५८, एन. सी. सी. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दिपक द्याल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सैनिक स्कूलचे सेक्रेटरी श्री सुनील राऊळ, संचालक जॉय डॉनटस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर, व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट, कॅथलिक पतसंस्था चेअरमन आनमारी डिसोजा, इंडियन एक्स सर्विसेस लीग चे जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, शशिकांत मोरजकर, सुभाष सावंत, क्रिडाशिक्षक शैलेश नाईक, डाॅ. मिलिंद खानोलकर, सुधीर नाईक, गजानन परब, सैनिक वसतिगृह अधीक्षक श्री मिसाळ, सुरेश गावडे, संजय शिंदे, प्राचार्य एन. डी. गावडे, प्रल्हाद तावडे, स्कूल स्टाफ, सैनिक पतसंस्था स्टाफ उपस्थित होते.
स्पर्धा १०, १४, १७ वयोगटातील मुले, मुली, खुला वयोगट मुले, मुली व जेष्ठ नागरिक अशा विविध वयोगटात घेण्यात आली.

यामध्ये १० वर्षा खालील वयोगटात प्रथम कु. जय पांडुरंग महोनगेकर, द्वितीय ओम मोहन शिरोडकर, तृतीय मायरा स्टीफन डिसोजा.

१४ वर्षा खालील मुले वयोगटात प्रथम कु. स्वराज तानाजी पाटील, द्वितीय अथर्व इराप्पा चिगारी, तृतीय आर्यन लक्ष्मण अहेर.

१० वर्षा खालील मुली वयोगटात प्रथम कु. ऋतुजा राजू जडे, द्वितीय कु. भक्ती अमित धुमक, तृतीय कु. श्रेया राजेश झोके.

१४ ते १७ वर्षा खालील वयोगटात प्रथम कु. सिद्धनाथ सत्यवान जगताप, द्वितीय ऋत्विक रामकुमार वर्मा, तृतीय सुमित बंडू पाटील.

खुला वयोगट महिला प्रथम शिल्पा शंकर केंबळे, द्वितीय सुजाता उमेश मुंडेकर, तृतीय वेदांती बलराम मनगुतकर.

खुला वयोगट पुरुष प्रथम वैभव सूर्यकांत नार्वेकर, द्वितीय कौस्तुभ डी. सावंत, तृतीय हरि ओम सिंग.

जेष्ठ नागरिक वयोगट प्रथम मेघ:शाम लक्ष्मण राणे, द्वितीय कल्लाप्पा तिरवीर, तृतीय नरसिंह दत्तात्रय कांबळे विजेते ठरले.

विविध वयोगटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात आली. बक्षिस वितरण ब्रिगेडियर सुधीर सावंत, युवराज लखमराजे भोसले, सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार मेजर उमेश आदर, व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली. स्पर्धेस सावंतवाडी नगरपरिषद, सैनिक वसतिगृह व सैनिक पतसंस्था यांचे सहकार्य लाभले.

सूत्रसंचालन ह्रषिकेश गावडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here