सावंतवाडी,दि.०८: तालुक्यातील नेमळे कुंभारवाडी रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण व संरक्षण भिंतीचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नेमळे गावच्या सरपंचा सौ. दीपिका भैरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
दरम्यान खासदार राऊत, व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी नेमळे ग्रामपंचायतला भेट दिली.
यावेळी सरपंच सौ दीपिका भैरे व उपसरपंच सखाराम राऊळ यांनी ग्रामपंचायत च्या वतीने खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शैलेश परब, बाळा गावडे, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शब्बीर मणियार, बाळू माळकर,अशोक राऊळ, महिला तालुका संघटक भारती कासार,उपसरपंच सखाराम राऊळ,शाखा प्रमुख सचिन मुळीक,ग्रा.सदस्य स्नेहाली राऊळ, शितल नानोस्कर, सागर नेमळेकर, एकनाथ राऊळ, सिद्धेश नेमळेकर, आरती राऊळ, संजना नेमळेकर, महादेव नाईक, विनोद राऊळ, गुंडू पांगम, भाई राऊळ, आबा सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.