विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे गावातून होत आहे कौतुक…
सावंतवाडी, दि.१३ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पुरस्कृत बाल, कला क्रीडा महोत्सव सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या सांगेली केंद्रस्तरीय स्पर्धेत . जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिरशिंगे नं. १ शाळेने जनरल चॉम्पयनशिप पटकावली. सदर स्पर्धा लहान व मोठा या दोन गटात आयोजित करण्यात आलेली होती.
शाळेतील विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे घवघवीत यश संपादन केले. लहान गटात: १०० मी धावणे यश महेश राऊळ (प्रथम क्रमांक), उंच उडी – यश महेश राऊळ (द्वितीय क्रमांक), रिले (50×4 ) मुलगे (प्रथम क्रमांक), खो-खो (मुलगे) – विजयी, 50 मी धावणे- अनुष्का ज्ञानेश्वर धोंड (द्वितीय क्रमांक), लांब उडी- अनुष्का अमोल राऊळ (द्वितीय क्रमांक), रिले (50×4) मुली (प्रथम क्रमांक), कबड्डी (मुली) – विजयी, खो खो (मुली)- विजयी, समूहगीत व समूहनृत्य- प्रथम क्रमांक मोठ्या गटात: 200 मी धावणे- संकेत बाबाजी धोंड (द्वितीय क्रमांक), लांब उडी – संकेत बाबाजी धोंड (द्वितीय क्रमांक), उंच उडी – राज दिपक राऊळ (द्वितीय क्रमांक), सुशांत सुधाकर राऊळ (तृतीय क्रमांक), शीळा फेक. दिपेश बाबली राऊळ (प्रथम क्रमांक), वेदिक विठ्ठल राऊळ (द्वितीय क्रमांक), रिले (100×4) मुलगे (द्वितीय क्रमांक) कबड्डी व खो-खो (मुली)- विजयी, लांब उडी – श्वेता सुमंत राऊळ (प्रथम क्रमांक), 100 मी धावणे – खेता सुमंत राऊळ (द्वितीय क्रमांक), उंच उडी – अमृता अशोक जाधव (प्रथम क्रमांक), रिले (100×4 मुली – द्वितीय क्रमांक, खो-खो (मुली)- विजयी, ज्ञानी मी होणार-अक्षरा अनिल राऊळ व सुशांत सुधाकर राऊळ (प्रथम क्रमांक)
याप्रमाणे यश संपादन करून शाळेने सांगेली केंद्र स्तरीय ‘जनरल चॅम्पियनशिप’ कायम राखली.
विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल सावंतवाडी तालुक्याच्या गटारीक्षणाधिकारी तथा माडखोल विस्तार अधिकारी श्रीम. कल्पना बोडके मॅडम, सांगेली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. जी. ए. सावंत सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊळ, उपाध्यक्षा श्रीम अभयश्री राऊळ, शिक्षणतज्ज्ञ श्री. गणपत राणे, श्री, फटू राऊळ, श्री. बाबाजी धोंड या सर्वांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
सर्व विद्यार्थी खेळाडूंना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सोनटक्के एस.टी, तसेच शिक्षक श्रीम. , सांगेलकर आर आर, श्रीम. राऊळ पी.पी., श्री. मुरकुटे यु. एस. यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच शिक्षक श्री. मनोहर परब व श्री. सोमनाथ वेठेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाचे शिरशिंगे गावातून कौतुक होत आहे.



