विज्ञान प्रदर्शनातून नवीन संशोधक घडतील…!

0
52

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विश्वास : कलंबिस्त येथे तालुका विज्ञान प्रदर्शन

सावंतवाडी, दि.०४ : ग्रामीण भागात सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि ते सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त भागात आयोजित केले. आणि ते उत्तमरित्या भरवले गेले, हे खरंच कौतुकास्पद आहे. कलंबिस्त हायस्कूलने हे प्रदर्शन यशस्वी केले त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करत आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून नवीन संशोधक आणि शास्त्रज्ञ घडतील असा विश्वास, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन कलंबिस्त हायस्कूलमध्ये दोन व तीन डिसेंबर या दोन दिवसीय कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ऑनलाईन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र रेडकर, एकनाथ सोनुर्लेकर, विभागप्रमुख जीवन लाड, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, संजय पालकर, विनायक सावंत, संदेश सोनुर्लीकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, सचिव चंद्रकांत राणे, बाबा राऊळ, वसंत सावंत, शंकर राऊळ, चंद्रकांत राऊळ, लाडजी राऊळ, मुख्याध्यापक अभिषेक जाधव पंचायत समिती माजी सदस्य रमेश सावंत, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर, गटशिक्षण अधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्गा साळगावकर, शिक्षणतज्ज्ञ काका मांजरेकर, म. ल. देसाई, एस. एन. सुर्वे, शशिकांत धोंड, सरपंच सुप्रिया राऊळ, सौ. पवार, नंदू गावडे, स्नेहा कुडतरकर, माजी सरपंच बाळू सावंत, प्रल्हाद तावडे, बाळा राजगे, राजेश पास्ते, सुनील सावंत आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने पोकळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कलंबिस्त भागात दर्जेदार असे विज्ञान प्रदर्शन होत आहे. येथील व्यवस्था खरोखरच उत्तम आहे. मोठ्या शहरातील शाळांच्या दर्जाला साजेसे विज्ञान प्रदर्शन ग्रामीण भागातील एका शाळेने भरविले, याचे कौतुक आहे, अशा शब्दात स्तुती केली.

प्रास्ताविक रामचंद्र घावरे यांनी तर सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक अभिषेक जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here