5G चा स्पीड किती याची टेस्ट घेत होते, काही सेकंदात संपला डेटा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

0
303

नवी दिल्लीः सध्या देशातील काही ठिकाणी 5G नेटवर्क (5G Network) लॉन्च केले गेले आहे. त्यामुळे आता सर्रास लोकं आपल्याही फोनमध्ये 5G चे नेटवर्क मिळण्याची वाट बघत आहेत. 5G नेटवर्क येताच काही लोकांनी 4G (4G Network) आणि 5G स्पीडमधील फरक बघण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र त्यानंतर झालेल्या प्रकारामुळे अनेकांना त्याचा धक्का बसला आहे. मोबाईल (Mobile Users) धारकांना 5G नेटवर्क आल्यानंतर ते तपासून बघण्याची अनेक उत्सुकता लागून राहिली होती. त्याच उत्सुकतेमुळे नेटवर्क पाहण्याचा नादात मात्र अनेक त्याचा फटका बसला आहे. 5G नेटवर्क तपासण्याचा ज्यांनी प्रयत्न केला होता, त्यानी आपला अनुभव ट्विटरवरुन शेअर केला आहे.

वेगवेगळ्या कंपन्यांकडून 4G आणि 5G ची सेवा सुरु झाली खरी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ज्यांनी ते चेक केले होते, त्यांना मात्र मोठा फटका बसला आहे.

ते चेक करत असताना त्यांचा निम्म्याहून अधिक डेटा नष्ट झाला आहे. 5G नेटवर्क वापरल्यानंतर त्यांचा मोबाईल डेटा झपाट्याने संपत आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मोबाईल धारकांना 5G वर 1Gbps पर्यंत स्पीड मिळणे अपेक्षित आहे, तर भारतात मात्र सध्या 5G नेटवर्कचे स्पीड हे 500 ते 600Mbps इतकेच उपलब्ध आहे.

5G च्या उच्च स्पीडमुळे डेटादेखील जास्त वापरला जात आहे. तरीही इतर कारणांमुळे हा डेटा लवकर संपण्याची शक्यता आहे.

मोबाईलवर अनेक जण युट्यूबवरील व्हिडीओ पाहत असतात. मात्र इंटरनेचा वेग कमी असतो त्यावेळी मात्र व्हिडीओ पाहताना चांगली क्वालिटी मिळत नसते.

मात्र एकदा का इंटरनेचे स्पीड वाढले की, त्यासाठी डेटाही अधिक लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही जर 5G वर व्हिडिओ पाहिल्यास, असलेला डेटा कितीतरी वेगाने संपून जातो.

Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्यांनी 5G सेवा सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांच्यासाठी कोणतीही स्वतंत्र योजना अद्याप जाहीर केली गेली नाही. तर जिओ कंपनीने मात्र आपल्या यूजर्सना अमर्यादित 5G च्या डेटाची ऑफर देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे एअरटेल वापरकर्त्यांना सध्याचा डेटा प्लॅनवर 5G स्पीड मिळत आहे. तथापि, जिओची सेवा मात्र ही सेवा इनवाईट बेस्ड असल्याने निवडक यूजर्सनाच फक्त ते उपलब्ध झाले आहे.तर एअरटेलच्या बाबतीत मात्र असं झालं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here