पुणे, दि.१४ : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल चे १८ वें प्रदेश संमेलन २४ डिसेंबर रोजी नांदेड शहरातील नरहर कुरुंदकर सभागृह येथे सकाळी ११ते ५ या वेळेत होणार आहे.
संमेलनात पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे जाणकार, वरिष्ठ पत्रकार जतिन देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संमेलन चार सत्रात होणार असून पहिले सत्र उद्गघाटन व पत्रकार परिचय ( माझी पत्रकारिता ),दुसरे सत्र वरिष्ठ पत्रकार मुलाखत व चर्चेचे असेल,तिसरे सत्र “पत्रकारिता काल,आज आणि उद्या” या विषयावर उपस्थित पत्रकारांच्या मार्गदर्शनाचे असेल तर चौथे सत्र समारोपचे असून राज्यातील पत्रकार व मान्यवर यांचा सन्मान यावेळी केला जाईल.
राज्यातील पत्रकारांनी नांदेड संमेलनास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ,असे आवाहन प्रदेशाध्यक्ष ईश्वर हुलवान,कार्याध्यक्ष राहुल कुलट,सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत ,जिल्हाध्यक्ष प्रा.साहेबराव बेळे ,सचिव केशव कांबळे,विभागीय अध्यक्ष कालिदास अंतोजी,उपाध्यक्ष गौतम लंके यांनी केले आहे.