सावंतवाडी,दि.०७: शासनाकडून सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण करत आहेत. मराठा समाजामध्ये हुशार व होतकरु विद्यार्थी शैक्षणिक सवलती पासून वंचित राहत आहे. म्हणून निरवडे ग्रामस्थांनी एकमुखी जरांगे पाटीलांना बैठक घेऊन समर्थन दिले आहे विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. मराठा आंदोलनास पाठींबा म्हणून सकल मराठा समाज निरवडे वासियांचा वतीने नुकतेच भुतनाथ मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहून एकमुखी पांठिबा दिला व सकल मराठा समाज सावंतवाडी तालुका यांनी आयोजित केलेल्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे सदा गावडे धर्माजी गावडे विजय गावडे नामदेव गावडे गुरुदास गावडे हरी वारंग, महेंद्र गावडे, नयनेश गावडे ,विनय गावडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.