सावंतवाडी,दि.०५: लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी व दै.तरुण भारत संवाद आयोजित ‘चांद्रयान -3’ या विषयावरील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेच्या शालेय गटात कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या कु.अमृता अरविंद पास्ते(इयत्ता-१० वी) हीने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. रोख रक्कम रु. ५०००/- व प्रशस्तीपत्र देऊन ९ नोव्हेंबर,२०२३ रोजी कुडाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमात तीचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे. तीला या स्पर्धेकरीता प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. किशोर वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अभिजीत जाधव, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.



