जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत माध्यमिक विद्यालय, सांगेली हायस्कूलची चमक कामगिरी..

0
166

सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी संघाची जिल्ह्यातून निवड

सावंतवाडी,दि.०५: तालुक्यातील श्री गिरीजानाथ ग्रामविकास मंडळ सांगेली संचलित माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली या विद्यालयातील विद्यार्थीनीनी सिंधुदुर्ग क्रीडा संकुलाच्या आवारात नेटवर झालेल्या शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत या संघाने विजय मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे त्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत हंसिका आनंद गावडे हिच्या नेतृत्वाखाली स्नेहल राऊळ, प्रांजल राऊळ, शमिका धर्णे, सेजल पवार ,सारिका कुंभार, नियती सांगेलकर ,वैभवी मोरजकर, वैष्णवी कुंभार,श्रुती लाड , अनुष्का राऊळ आणि विशाखा सावंत यांनी भाग घेतला.हंसिका गावडे ,प्रांजल राऊळ आणि स्नेहल राऊळ यांच्या दमदार कामगिरीमुळे हा विजय प्राप्त झाला. त्यामुळे विभागीय स्तरावर सातारा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या कबड्डी खेळासाठी क्रीडा शिक्षक श्री. ए. एम.सावंत सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थी खेळाडू विशेषतः श्रावणी राऊळ,वैष्णवी पालव आणि हर्षद राऊळ यांचेही मार्गदर्शन लाभले .शाळेतील मुलींच्या या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य आर.डी .घावरे सर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पुनाजी राऊळ आणि सचिव विश्वनाथ रामचंद्र राऊळ इतर सर्व संस्था चालक शिक्षक, शिक्षकेतर चा कर्मचारी व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या देशाबद्दल सांगली पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here