मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली खारभूमी विभागाला घालण्यात येणार घेराव..आबा चिपकर
वेंगुर्ला, दि.०३: शिरोडा ग्रामपंचायत हद्दीतील वेळागर वाडीत जाणाऱ्या मार्गावरील दोन छोटी पुले असुन त्यापैकी एका पाईप लाईनचें झाकण मोडल्यामुळे समुद्राचें पाणी माड बगायतीत शिरून ग्रामस्थांचे नुकसान होतं आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील वेंगुर्ला खार भूमी विकास विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली खारभूमी विभागाला घेराव घालून जाब विचारण्यात येणार आहे.
शिरोडा वेळागरवाडीत जाणाऱ्या मार्गांवर दोन छोटी पुले आहेत. त्यावर दोन पाईपलाईन टाकण्यात आले असून दोन्ही पुलांच्या एक एक पाईपचीं झाकणे मोडली आहेत. सध्या दोन्ही पाईप लाईन उघडी असून त्यातून समुद्राचे पाणी पाईप मधून शिरून माड बागायतीत घुसत आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर बागायतीचे नुकसान होतं आहे. याबाबत शिरोडा ग्रामपंचायत व खार भूमी उपविभाग वेंगुर्ला यांच्याकडे दोन वेळा पत्रव्यवहार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या स्थितीत समुद्राला मोठे उधाण येत असून मोठी भरती येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी घुसून नुकसान होतं आहे. याबाबत माजी आमदार तथा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जी.जी उपरकर यांच्या मार्गदर्शनखाली वेंगुर्ला खार भूमी विभागाला घेरावं घालून जाब विचारणार असल्याचे मनसे वेंगुर्ला
माजी.तालुका सचिव तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हा सहसचिव आबा चिपकर यांनी सांगितले आहे.