सावंतवाडी,दि.१६ : येथील मडुरा श्रीदेवी माऊली मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी परब यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा माजी नगराध्यक्ष संजू परब,तेजस माने, विकास परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.