सावंतवाडी,दि.१२: सहकार रत्न पी. एफ. डॉन्टस यांनी समाजात वावरत असताना सहकाराची भावना जोपासून नाती जपली.
त्यामुळे त्यांचा आदर्श येणाऱ्या पिढीने घ्यावा. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. त्यांचे विचार आणि कार्य कायम तेवत राहण्यासाठी सर्वांकडुन प्रयत्न व्हावेत, असे मत आज येथे आयोजित शोकसभेत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले. डॉन्टस यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आज येथील नवसरणी सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी त्यांना आदराजंली वाहीली.
यावेळी शालेश शिक्षण मंत्री दिपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत, फादर मिलेट डिसोझा, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माझी सभापती रवींद्र माडगावकर, माजी जि.प सदस्य मायकल डिसोजा, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला प्रदेश अध्यक्षा अर्चना घारे-परब, एम. डी. देसाई, बाबुराव कविटकर, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सैनिक पतसंस्थेचे माजी चे शिवराम जोशी, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे ,रुजॉय रोड्रिक्स, माजी सैनिक तातोबा गवस, डॉ. विलास सावंत, कॅथलिक बँकेचे सीईओ जेम्स बोर्जेस, चंद्रशेखर जोशी, सैनिक पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, दीपक राऊळ, ऋषिकेश गावडे आजी – माजी सैनिक, आदी मान्यवर उपस्थित होते.