सहकार क्षेत्रातील एक नामांकित व्यक्ती सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांची गुरुवार दि .१२ रोजी शोकसभा..

0
57

सावंतवाडी,दि.१०: सहकार क्षेत्रातील एक नामांकित व्यक्ती सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस हे एक माजी सैनिक होते, निवृत्तीनंतर त्यांनी सहकार, शैक्षणिक, सामाजिक व राजकिय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी केलेली आहे.
असे बहुयामी व्यक्तीमत्त्व आज आपल्यापासून दि. ०८/१०/२०२३ रोजी अनंतात विलीन झालेले आहे. त्यांनी समाजात केलेल्या बहुमोल कार्याची आठवण म्हणून गुरुवार दि. १२/१०/२०२३ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता नवसरणी केंद्र, जेलच्या मागे, सावंतवाडी येथे शोक समेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या शोकसभेस तमाम नागरिक व स्नेहीजणांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी विनंती, पी. एफ. डॉन्टस सर्व हितचिंतक, मित्रमंडळ, विविध संस्था व परिवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here