सावंतवाडी सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम
सावंतवाडी,दि.१० : राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार स्पर्धा २०२३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान कोकणातील पहिल्या सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्राप्त केला. यंदा या मंडळाच ११८ व वर्ष असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हे मंडळ पात्र ठरलं आहे.
गेली ११८ वर्ष या मंडळाकडून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने निघणारी विसर्जन मिरवणूक ही विशेष आकर्षण असतं. यावर्षी महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा साकारत गड किल्ले संवर्धनाचा संदेश मंडळान दिला होता. राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम येण्याच मान मंडळान पटकाविला आहे. याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सालईवाडा गणेशोत्सव मंडळावर केला जात आहे.