किरण सामंताचा तो “स्टेटस” अजित पवारांच्या नाराजीतून
सावंतवाडी,दि.०९: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत फक्त विनायक राऊतांचा पराभव हाच आमचा अजेंडा आहे. त्या दृष्टीने आमची व्यूहरचना सुरू आहे. त्यासाठी भाजपचे वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याला बहुमताने निवडून आणू, असा दावा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी केला. दरम्यान किरण सामंतानी ठेवलेला मशालीचा स्टेटस माझ्यासाठी नसून अजित पवारांसाठी होता असे यावेळी सांगितले.


यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महेश सारंग, संजू परब, राजन म्हापसेकर, महेश धुरी कविटकर आदि यावेळी उपस्थित होते.



