सावंतवाडी,दि.०५: कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी तर्फे येथे २८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी कवी संमेलन घेण्यात येणार आहे तसा निर्णय मासिक सभेत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता आरपीडी हायस्कूल च्या सभागृहात घेण्यात येणार आहे. असे तालुका अध्यक्ष ॲड संतोष सावंत यांनी माहिती दिली. सावंतवाडी तालुका कोकण मराठी साहित्य परिषदे ची मासिक बैठक बुधवारी सायंकाळी घेण्यात आली या बैठकीत ॲड.प्रा.अरुण पणदूरकर यांना ‘गोमंतक जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल व प्रा. रुपेश पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल या दोघांचाही अभिनंदन ठराव बैठकीत घेण्यात आला व त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदी उपस्थित होते या बैठकीत येत्या २८ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा दिनी कोजागिरी कवी संमेलन उपक्रम सायंकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे, आणि कविताने कोजागिरी साजरी केली जाणार आहे. यासाठी सावंतवाडी तालुक्यातील नवोदित कवींनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे ठरवण्यात आले. तसेच यावेळी विविध उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली.