मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांची माहिती
सावंतवाडी,दि.१६: मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठवड्यात हजर झालेले डॉ.अमोल चौवरे यांची बॉंडवर नियुक्त झालेली असून त्यांचा बॉंड कालावधी कमी राहिला आहे.मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नव्याने बॉंडवर नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या डॉक्टरांमध्ये मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात एक डॉक्टर नियुक्त करावा अशी मागणी निवेदन देऊन केली होती.नव्याने बॉंडवर नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टर मधुन डॉ.राखी राज यांना मळेवाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात आली असून त्यां याठिकाणी रुजू होणार आहेत.मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने डॉ.राखी राज यांची नेमणूक केल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण व स्थानिक आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी यांचे हेमंत मराठे यांनी आभार मानले आहे.