माजी जि. प. सदस्य राजू कविटकर यांच्या प्रयत्नांना यश
कुडाळ,दि.३१ : तालुक्यातील माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध प्रकाश मुणेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बरेच दिवस एम. बी. बी. एस. डॉक्टर उपलब्ध नसलेल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत होती.
ही बाब लक्षात घेऊन खा. विनायक राऊत आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून माजी जि. प. सदस्य राजु कविटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. सई धुरी, डॉ. संदेश कांबळे यांच्याशी चर्चा करून माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती कविटकर यांनी दिली आहे.