प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे
उरण,दि.११ : द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशन ही क्रीडा क्षेत्रातील नामवंत व प्रसिद्ध अशी संस्था असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन उरणमध्ये करण्यात आले आहे.राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन नाटयकर्मी यशवंत तांडेल यांच्या हस्ते
स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, उरण शहर येथे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्यातून आलेल्या १६ संघानी या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत सहभाग घेतला. या प्रसंगी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोशिएशनचे अध्यक्ष महादेव घरत,रायगड भूषण जेष्ठ साहित्यिक एल. बी
. पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चिंतामण गायकवाड, यशवंत ठाकूर, मछिंद्र घरत, किरण घरत, एन. एम. म्हात्रे, रविंद्र पाटील, रमणिक म्हात्रे, उत्तम कडवे, मोहन भोईर, दिलीप तांडेल, नरेश म्हात्रे, सचिन पाटील, क्रीडा विभाग प्रमुख भरत म्हात्रे, शिवेंद्र म्हात्रे, आतिष पाटील,प्रशिक्षक -प्रवीण तोगरे, इरफान खान आदि मान्यवर उपस्थित होते.खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लायन्स क्लब ऑफ उरण आणि लिओ क्लब ऑफ उरण, गाडे हॉस्पिटल उरण, तेजनक्ष हॉस्पिटल उरण, इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. खेळाडूंच्या आरोग्याची काळजी त्यांनी उत्तम प्रकारे घेतली.दि १३ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. फूटबॉल स्पर्धा व वर्षा मॅरेथॉन स्पर्धा या दोन्ही स्पर्धाचे बक्षीस पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता सेझ मैदान,बोकडविरा,चारफाटा पेट्रोलपंपाजवळ उरण येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी दिली.