सावंतवाडी,दि.१०: गेले काही महिने सावंतवाडीचा आठवडा बाजार हा शासकीय धान्य गोदामच्या परिसरात भरत आहे.
येथील आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. नगरपरिषदेने उपलब्ध करुन दिलेल्या या जागेमध्ये सध्या बाजार भरत आहे. मात्र या ठिकाणी प्रसाधनगृहाची सोय नसल्यामुळे दुकान व्यावसायीक विशेषकरुन महिला दुकानधारक यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच पार्किंगची समस्याही भेडसावत आहे. याबाबत दुकानधारकांमधून तसेच सामान्य नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत प्रशासनाकडूनदेखील कोणतीही कार्यवाही केली जात नाहीये. |
एक तर आठवडा बाजार भरविण्यात येणारी जागा बदला अन्यथा त्या ठिकाणी प्रसाधनगृहाची सोय करा अशी मागणी महिला व्यावसायिक व नागरिकांमधून होत आहे.