सावंतवाडी,दि.०१ : तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा सावरवाड या शाळेतील गरजू विद्यार्थांना जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्या पुढाकारातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी उपसरपंच अनिकेत म्हाडगुत,ग्रा. प.सदस्या सौ सुवर्णा कुडतरकर,सौ.रेषा तेली,श्रीमती.विजया सावंत,तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सुचिता वर्दंम,महेंद्र दळवी,सौ दळवी,सौ सावंत,सौ.पवार, आदी शाळा व्यवस्थापन सदस्या,अनिल मेस्त्री,सर्व शिक्षक वर्ग सौ.रश्मी नाईक मॅडम, सौ.आदिती चव्हाण,सौ.सावंत मॅडम उपस्थित होते.