सावंतवाडी, दि.०१: येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने देव माणूस डॉक्टर ज्ञानेश्वर दूर्भाटकर यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉक्टर दुर्भाटकर यांनी सावंतवाडीतील जनतेने आणि पत्रकारांनी आपल्याला काम करत असताना सहकार्य केले व खूप प्रेम दिले. मी जरी निवृत्त झालो तरी माझ्या हातून चांगले कार्य होत राहील, राजा शिवाजी चौक मित्र मंडळ नेहमी चांगले उपक्रम घेत असतात त्यांनी केलेला हा सत्कार कायमस्वरूपी माझ्या हृदयात राहील अशा प्रकारे त्यांनी मंडळाचे आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सीताराम गावडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सुरेश भोगटे, राजा शिवाजी चौक मित्र मंडळ अध्यक्ष बंटी माटेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, विजय सावंत, प्रदीप नाईक, विजय पवार, दीपक सावंत, महादेव राऊत, बंड्या कुलकर्णी, अरुण घाडगे, रूपाली बुधाळे, सचिन बागवे, सुंदर गावडे, रमेश बोंद्रे, राजेंद्र मसुरकर, रवी जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान दरवर्षीप्रमाणे राजा शिवाजी चौक मित्र मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.