मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर आणि ग्रामस्थांची महावितरणला धडक..

0
82

सावंतवाडी,दि.२१: न्हावेली ग्रामपंचायत हद्दीमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत महावितरणचे सहाय्यक अभियंता अनिकेत लोहार यांना घेराव घातला तसेच पावसाळा सुरू होण्याअगोदर विद्युत पोलांवर असणारी झाडे लवकरात लवकर तोडण्यात यावी अशी मागणी त्यांनी महावितरणकडे केली तसेच ग्रामपंचायतच्या नळ योजनेला विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणीही गावात मिळत नाही. याकडे आपण लक्ष द्यावे त्याचप्रमाणे आपले विद्युत कर्मचारी मीटर लावणे, सर्विस वायर ओढणे किंवा अन्य कामासाठी नागरिकांकडून पैशाची मागणी करतात त्यामुळे आपण आपल्या स्तरावर त्यांना समज द्या अन्यथा आम्ही त्यांना समज देऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच सदर निवेदनांवर ग्रामस्थांनी सह्या देखील केलेले आहेत. आपण याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आम्हांला आंदोलन छेडावे लागेल असा इशारा आहे त्यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत चेतन पार्सेकर, साहिल मांजरेकर, अमोल पार्सेकर आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी खालील प्रमाणे आपली नावे देऊन सह्या केलेल्या आहेत उदय परब,. किरण माळकर, सुदन पार्सेकर ,प्रथमेश नाईक, विलास मेस्त्री , समिर पार्सेकर,अजय पार्सेकर ,विजय काशिराम नाईक माजी पोलीस पाटील न्हावेली,संकेत पार्सेकर, दत्तप्रसाद पार्सेकर,सिद्धेश पार्सेकर, प्रथमेश आरोंदेकर, संदीप मांजरेकर, तुकाराम पार्सेकर, सावळाराम न्हावेलकर, राज धवन ,
भावेश पार्सेकर, सुंदर पार्सेकर विठ्ठल परब आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here