सावंतवाडी,दि.१९ : शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याबरोबरच धूम स्टाईल बाईक चालवणाऱ्यावर आळा घाला अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याजवळ केली.
मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से. जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळाने प्रभारी पोलीस निरीक्षक श्री अधिकारी यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी शहरातील विविध समस्यावर त्यांचे लक्ष वेधले. यामध्ये सावंतवाडी शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे कित्येक महिने बंद आहेत हे कॅमेरे त्वरित सुरू करण्यात यावेत. बऱ्याच वेळा बंद असलेल्या कॅमेऱ्यामुळे गुन्ह्याचा तपास करताना अडथळे येतात त्यामुळे याबाबत जातीनिशी लक्ष घालावा. दुसरीकडे शहरात अल्पवयीन युवक धूम स्टाईल बाईक चालवतात यामुळे बऱ्याचदा अपघाताची भीतीही उदभवते सदरचे धूम स्टाईल बाईकवर जास्त करून तलावाच्या काठावर सायंकाळच्या वेळी बाईक चालवतात त्यामुळे शहरात ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून अशा युवकांवर दंडात्मक कारवाई हाती घ्या.
सावंतवाडी शहरात अलीकडे पुन्हा एकदा घरफोडी व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच काही दिवसात घरफोडीचे प्रकार शहरात घडले. त्यामुळे शहरात येणारे परप्रांतीयांची नोंद पोलिस ठाण्यात वेळच्यावेळी करा जेणेकरून कोणी नोंद केली नाही अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. तर नगरपालिकेच्या शिवउद्यानात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याबरोबरच समोरील पार्किंगच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करा अशी मागणी ही पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, माजी उपशहराअध्यक्ष प्रवीण गवस, निलेश मुळीक, मनोज कांबळी, सुरेंद्र कोठावळे, दिनेश मुळीक, अभय देसाई, दर्शन सावंत, भाऊ गावडे, सागर मुळीक आदी उपस्थित होते.