सावंतवाडी, दि.१३ : कुडाळ हायस्कूलमधील दहावीच्या पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सावंतवाडी संस्थानचे बाळराजे भोसले यांच्या हस्ते गुणगौरव १४ जूनला राजवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कुडाळचे समाजसेवक सदासेन सावंत यांनी या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कुडाळ हायस्कूलचे दहावी परीक्षेतील पहिले पाच क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी वरद माईणकर, राधिका तेरसे, अन्वय पाटकर, युतिका पालव, शांभवी परब, स्वस्तिका दुधगावकर यांचा बाळराजे भोसले, शुभदादेवी भोसले, लखम सावंत-भोसले, श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती सदासेन सावंत यांनी दिली.