पालिका प्रशासनाने तात्काळ योग्य ती भूमिका घ्यावी.. मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांची मगणी.
सावंतवाडी,दि.२९ : मोती तलावातील पाणी सोडण्यात आल्यानंतर गाळयुक्त चिखल आणि पात्रातील मासे मृत्यूमुखी पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या नागरिक व व्यापाऱ्यांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. दरम्यान या दुर्गंधीमुळे रोगराई पसरु नये यासाठी पालिका प्रशासनाने तात्काळ योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केली आहे.
गाळ काढणे, मोती तलावातील संरक्षक कठडे बांधण्याचे काम पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तलावातील पाणी सोडण्यात आले आहे. मात्र पात्रात चिखल आणि मासे मृत झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. याबाबत मनसेच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात आली असून याबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी श्री. सुभेदार यांनी केली आहे.