सावंतवाडी, दि. २४ : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी इन्सुली येथील एसुस आश्रमात भेटवस्तू तसेच खाऊ वाटप करण्यात आले व तुळस येथील गोवर्धन मंदिर येथे मनसेच्या वतीने सोलर स्ट्रीट लाईटचे लोकरपण करण्यात आले. सदर लाईट मनसे लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम सूर्यकांत मयेकर यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला यासाठी मा तालुका सचिव आबा चिपकर यांनी लक्ष वेधले व म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या हस्ते नारळ वाढवून सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले सदर कार्यक्रमास मनसेचे बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे म.न.वि.से तालुकाध्यक्ष नाना देसाई शहराध्यक्ष निलेश देसाई शुभम सावंत ग्रा.प सदस्य आदेश सावंत इन्सुली माजी शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे दिनेश मुळीक सर्पमित्र महेश राऊळ प्रदीप सावंत, प्रशांत उर्फ जॉटी सावंत, रोहन राऊळ, हर्षल राऊळ, बाळकृष्ण राऊळ, अक्षय रेवणकर, सर्वेश राऊळ, किशोर राऊळ, विवेक तिरुडकर, ओमकार राऊळ, लउ उर्फ अण्णा राऊळ, प्रवीण राऊळ, गणेश राऊळ, शुभम शंकर राऊळ उपस्थित होते.