⬛ विधानसभा अध्यक्षांची माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतली सदिच्छा भेट

0
153

🟤 सावंतवाडी शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधी देऊ..ॲड.राहुल नार्वेकर

🖼️सावंतवाडी,०६ : भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांची त्यांच्या सरस्वती या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
ॲड. नार्वेकर हे खासगी कामानिमीत्त कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी संजू परब यांनी त्यांच अभिनंदन करत असताना सावंतवाडीचे सुपुत्र विधानसभा अध्यक्ष आहेत याचा गर्व असल्याचे गौरवोद्गार काढले. तर यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी संजू परब यांच्याकडून शहरातील समस्यांचा आढावा घेतला. तर शहर विकासासाठी ५ कोटी रूपयांचा विशेष निधी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे देणार असल्याचा शब्द दिला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, आनंद नेवगी, विनोद सावंत आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here