सावंतवाडी,दि.०९: येथील जिमखाना मैदानात दिनांक ११ मे ते २१ मे २०२३ या कालावधीत कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून वर्षभरामध्ये विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी वासियांचा आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये सुमारे दोनशे हून अधिक विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात येणार असून यात विविध नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्यांचे प्रदर्शन आणि विक्री देखील असणार आहे. तसेच विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवात होणार आहे. देश-परदेशीय खाद्यपदार्थांची प्रदर्शन तसेच विक्री देखील आकर्षण असणार आहे. याबाबतची माहिती संचालक विकास गावकर यांनी दिली यावेळी मयूर ठाकूर रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.
महोत्सवात लहानांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनासाठी “मनोरंजन नगरी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचे देखील असणार असून यामध्ये खास महिलांसाठी “खेळ पैठणीचा” तसेच रेकॉर्ड डान्स स्पर्धा सिंधुदुर्गातील गायक स्पर्धकांसाठी आवाज सिंधुदुर्गाचा ही गायन स्पर्धा ब्युटी कॉन्टेस्ट साठी “मिस सिंधुदुर्ग स्पर्धा” आणि सावंतवाडी डान्स अकॅडमी चे सांस्कृतिक कार्यक्रम, आर्केस्ट्रा विशेष म्हणजे तालुक्यातील विविध लोक कलाकारांना कोकण नाऊच्या व्यासपीठावर आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी निर्माण होणार आहे
कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी खालील क्रमांक वर संपर्क करावा असे आवाहन कोकण नाऊ चॅनलच्या संचालिका वैशाली विकास गावकर यांनी केले आहे.
संपर्क:- 9370440893/8408929923