बळीराजा चिंतेत..
सावंतवाडी,०६ : तालुक्यात आज माडखोल गावासहित काही ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका भात शेतीला बसला आहे. त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंतेचे वातावरण दिसत आहे. काही दिवसापूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा हजेरी लावल्याने माडखोल परिसरासह तालुक्यातील काही ठिकाणी नागरिकांची अवकाळी पावसामुळे भलतीच तारांबळ उडाली.