यानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
सावंतवाडी,दि.०५: तालुक्यातील कलंबिस्त पास्तेवाडी येथे बुधवार दिनांक ११ मे २०२३रोजी श्री देव तावडेवस नुतन मंदिर कलशारोहण समारंभ संपन्न होणार आहे.
यानिमित्त बुधवार दिनांक १० मे रोजी दुपारी ०३ वाजता कलंबिस्त घणशेळवाडी,मळा ते तावडे वस मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ११ मे रोजी सकाळी ०८ वाजता धार्मिक कार्यक्रम देहशुद्धी, प्रायश्चित,देवता वंदन, गणपती पूजन,पुण्याह वाचन, देवकर श्री रवींद्र तुकाराम तावडे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १० वाजता वास्तू स्थापना ११ वाजता मूळ पुरुष जिर्णोद्धार, १२.३० वाजता कलशारोहण, ०१ वाजता अभिषेक, १.३० वाजता महाआरती, सामुदायिक प्रार्थना दुपारी ०२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ०५ वाजता माऊली मंडळ शिरशिंगे यांचा हरिपाठ,०६.३० दीपोत्सव, ०७ वाजता श्री सनम देव प्रासादिक मंडळ सांगेली यांचे भजन, रात्री ०८ वाजता सत्कार समारंभ,०९ वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ(बाबी कलिंगन प्रस्तुत) त्रिखूर ब्रम्हांड प्रलय हा ट्रिक्ससीन युक्त नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन तावडे परिवार, श्री प्रल्हाद तावडे आणि तावडे वस मंदिर समिती कलंबिस्त यांनी केले आहे.