मंत्री केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी..

0
100

सावंतवाडी,दि.१४: भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी – जयंती निमित्त शिवसेना पक्षाच्यावतीने मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्या उपस्थितीत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, शहर महिला आघाडीप्रमुख सौ. भारती मोरे, गजानन नाटेकर, सौ. माधुरी वाडकर, श्री. गुंड जाधव, सौ. शिवानी पाटकर, विनायक उर्फ अब्जु सावंत, श्री. आबा केसरकर, श्री. नंदु गावडे, सौ. निलिमा चलवादी, सौ. पुजा नाईक, सौ. लतिका सिंग, सौ. सिमा सोनटक्के, मंगेश कदम, सौ. कांचन जाधव, श्री. पांडुरंग नाईक, श्री. सदाशिव कदम, श्री. नंदु शिरोडकर, श्री. एकनाथ हळदणकर, श्री. परशुराम चलवादी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here