विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांचा या कीर्तन महोत्सवात करण्यात आला भव्य दिव्य सत्कार..
सावंतवाडी,दि.१२:श्री सद्गुरू स्वामी समर्थ सेवा मठ माडखोल ट्रस्ट च्या वतीने तसेच श्री सद्गुरू स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट डोंगरपाल च्या वतीने किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांचा या कीर्तन महोत्सवात भव्य दिव्य सत्कार करण्यात आला… आज या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रजनाने झाले.

यावेळी व्यासपीठावर विशाल परब,वंदनीय महाराज, प्रमोद सावंत यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवनात मोक्ष व शांतीसाठी कीर्तनाची आवश्यकता आहे.कीर्तनाने मन प्रसन्न होतं.आजच्या दूरदर्शन व इंटरनेटच्या जमान्यात आजही कीर्तनाची गोडी तशीच टिकून आहे.किर्तनाचे हे महात्म्य टिकून राहिले पाहिजे.यासाठी मी सर्व कीर्तन मंडळीच्या पाठीशी ठामपणे उभा असून विशाल सेवा फाऊंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेल.असे सांगत मदतीचा हात विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक विशाल परब यांनी दिला आहे.