आरोपी पोलिसांच्या ताब्यात दोन दिवसाची पोलीस कोठडी
चिपळूण ०३ : इथं थांबू नकोस चोऱ्या होत आहेत चल तु पोलीस स्टेशन ला चल असे सांगून एका तरुणाला गुहागर रोड बावशेवाडी पाण्याच्या टाकीजवळ नेऊन मारहाण करीत लुबाडल्याची घटना नुकतीच चिपळूण मध्ये घडली आहे.
चिपळूण पोलिस स्थानकातून उपलब्ध झालेल्या माहिती नुसार या गुन्ह्याबाबात राहित अलिनूर इस्लामिया वय १९ वर्ष .रा. फरशी तिठा, चिपळूण या प्लास्टर व्यवसाय करणाऱ्या या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे. तर अनिस जहिर कादरी वय २५ रा. नांदगाव ,मुस्लिम मोहल्ला ता.खेड दि. २७ ऑक्टोबर रोजी दु.२ वा २० वा नमुद तारखेस. वेळी व जागी यातील आरोपीत याने फिर्यादी यांस अपरांत हॉस्पिटलचे समोर त्याची लाल रंगाची मोटारसायकल क्र. एम.एच./०८/ए.एल./४७२२ ने अडवून “इधर बहुत चोरी हो रही है,
चल तु पोलीस स्टेशन में चल, उघर जाके किसको फोन करना हे कर, पुलीस थाने में साईन कर के
छोड़ देता हु” असे हिंदीमध्ये बोलून पोलीस ठाण्यात घेऊन न जाता बावशेवाडी मार्गे गुहागर बायपास
रोडवर गाडी लावून पाण्याच्या टाकीजवळ जाऊन फिर्यादी यास शिवीगाळ करीत हातापायाने मारहाण
करून फिर्यादीचे पॅन्टचे उजव्या खिशामध्ये असलेला रिअल मी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट चोरून
नेलेला आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्हयाचेकामी आरोपीत अनिस जहीर काद्री, वय २५ वर्षे यास दिनांक २९/१०/२०२२ रोजी ००.४८ वाजता मा सवोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करुन अटक करण्यात आलेली असुन काल मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी,पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक
पोलीस निरिक्षक रत्नदीप साळोखे आणि पोलीस या गुन्ह्यांचा अधिक तपास करीत आहेत.