प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बांदा,दि.१९ : ग्रामपंचायत, निगुडे १५वित्त आयोगामार्फत महिलांना व्यवसाय प्रशिक्षण कोल्हापूर संस्थेमार्फत देण्यात आले.यावेळी कोल्हापूर व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय देसाई, प्रशिक्षणार्थ श्री.प्रकाश पाटील यांनी प्रशिक्षण दिले.स्त्री शिक्षणाच्या जनक जननी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दिनांक १५ मार्च ते १८ मार्च पर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम गावात तीन ठिकाणी ठिकाणी चालला. या तीन दिवसीय प्रशिक्षणार्थ ५० महिलांनी प्रशिक्षण घेतले. व अनेकांनी कापडी पिशव्या बनविल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशासेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर यांनी केलं.यावेळी कोल्हापूर व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय देसाई यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की कोणताही व्यवसाय किंवा त्याचे प्रशिक्षण घेत असताना महिलांनी ते घेतल्यानंतर त्यातून मी पहिल्यांदाच असं बघितलं की रात्री दोन दोन वाजेपर्यंत महिलांनी सदर कापडी पिशव्या बनवल्या. खरोखर ही बाब निगुडे गावासाठी कौतुकास्पद आहे.आपण व्यवसाय प्रशिक्षण घेतलात आणि त्यातून आपण काहीतरी एक ऊर्जा निर्माण केली.हे पाहून मी खरोखर भारावून गेलो.असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी निगुडे गावचे सरपंच श्री. लक्ष्मण निगुडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत असताना गावातील महिलांनी सक्षमपणे पुढे यायचं आणि व्यवसाय उद्योग करायचा माझ्या परीने जे सहकार्य असेल, ते मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास करीन असं वचन देतो.आपण या १५० ते २०० कापडी पिशव्या विविध ११ प्रकारच्या बनवल्यात खरोखर कुठेतरी महिलांसाठी दहा टक्के निधी ग्रामपंचायत च्या माध्यमातून महिलांसाठी असतो त्याचा पुरेपूर उपयोग झाला. असं मला एकंदरीत वाटतं पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं कौतुक आणि या प्रशिक्षणामध्ये बघायला गेलो तर वय वर्ष ७० असणाऱ्या सौ. सविता गावडे यांनी एक बॅग बनवली खरोखर हे सुद्धा एक मोठा कौतुक आहे.यावेळी माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे यांनी सांगितलं की या प्रशिक्षणात गेले तीन दिवस मी ११ प्रकारच्या पिशव्या मग पर्स, असून दे ट्रॅव्हल बॅग, असून दे मुलांचे दप्तर असून दे हे पूर्णपणे मी शिकले.खरोखर प्रशिक्षणार्थी पाटील सरांचं मी अभिनंदन करते की त्यांनी रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रत्येक वाडीत फिरून गावात ज्यावेळी प्रशिक्षण सुरू झालं त्यावेळी त्यांनी शिलाई मशीन पण बिघडलेल्या त्यांनी चालू केल्या म्हणजे कुठेतरी ग्रामपंचायत च्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना या व्यवसायातून एक रोजगाराची संधी निर्माण केली हे आमच्यासाठी आम्ही आमचे भाग्य समजतो.यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.शेवटी आमचा गाव विकासाचा ध्यास असे गाणे म्हणून शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संजय देसाई, प्रशिक्षणार्थी श्री प्रकाश पाटील, निगुडे गावचे विद्यमान सरपंच लक्ष्मण निगुडकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, माजी उपसरपंच गुरूदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे, शमिता नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य ईशा तुळसकर, विषया गवंडे, सीआरपी संजना केसरकर, संजना गावडे, महिला बचत संघ अध्यक्ष सदस्य महिला, युवती असे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.