केसरकर यांनी आंबोली बेळगाव ची मालमत्ता पक्षासाठी विकली.. तालुकाप्रमुख नारायण राणे
सावंतवाडी,दि.१४ : ज्यानी निधी आणला त्याच्याच निधीवर पैसे कमवले आणि आता त्याच्यावर आरोप करता म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असून मंत्री दीपक केसरकर यांनी पक्षासाठी बेळगाव व आंबोलीतील मालमत्ता विकली यांचे साक्षीदार आम्ही आहोत त्यामुळे ज्याचे आयुष्य टक्केवारी गेले त्यांनी केसरकरावर बोलणे हे दुर्दैव आहे.अशी जोरदार टिका शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे यांनी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ याच्यावर केली.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो,बाबू कुडतरकर,मंगलदास देसाई गजानन नाटेकर भारती मोरे आदि उपस्थित होते.
राणे म्हणाले,राऊळ यांना मागच्या काळात सुगीचे दिवस होते. पण आता सत्ता नाही त्यामुळे त्याची अडचण झाली आहे.निधी नाही त्यामुळे टक्केवारी नाही म्हणून ते मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका करतात पण ही टिका करतना त्यानी हाही विचार करावा कि मागील काळात ज्यानी निधी आणला त्यांच्यावरच आज तुम्ही टिका करत आहे.ज्यांनी राजकारणात पैसे कमावयाचे सोडून आपली मालमत्ता विकून पक्ष वाढवला यांचे आम्ही साक्षीदार असून बेळगाव व आंबोली येथील मालमत्ता त्यानी विकल्याचे राणे यावेळी म्हणाले.
एकाच पदाला जे वर्षानुवर्ष चिकटून आहेत जे दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देत नाहीत आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला खुष करूनच ते एवढी वर्षे या पदावर असल्याचा आरोप ही राणे यांनी केला.मागील काळात ही मी टक्केवारीचा आरोप राऊळ याच्यावर केला होता.त्यांच्यासोबत मी टक्केवारीचे काम कधीही केले नाही असा खुलासा ही यावेळी त्यांनी केला.
तर लोबो यांनी ही राऊळ याच्यावर सडकून टीका केली जे भांड्याच्या घरात राहत होते.त्यांनी अचानक सदनिका खरेदी केली यांचे गुपित काय असा सवाल करत केसरकर हे यांनी लोकहिताचे राजकारण केले असून टक्केवारीचे राजकारण केले नाही.खोके म्हणता त्याचा अर्थ काय आम्हाला आंब्याचे खोके माहीत आहेत त्यामुळे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना जनता ओळखून असल्याचे लोबो म्हणाल्या.
अॅड निता सावंत-कविटकर यांनी पाच वर्षांत मंत्री केसरकर यांची मालमत्ता दुप्पट होण्यामागे रेडीरेकनर चा दर कारणीभूत असून मालमत्तेचे दर हे दरवर्षी वाढत जातात असे सांगितले.त्यामुळेच हा दर वाढला असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.