हैदराबाद: सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रेत अनेक लोकं सहभागी होत आहेत. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेत 2016 मध्ये आत्महत्या करणारा दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी रोहित वेमुलाबद्दल ट्विट करत त्यांनी सांगितले की, रोहित वेमुला म्हणजे सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरुद्धच्या माझ्या संघर्षाचे प्रतीक आहे. तसेच रोहित वेमुलाच्या आईने या यात्रेत सहभाग दर्शवल्याने भारत जोडोला नवे धैर्य मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर हैदराबाद दौऱ्यामध्ये राहुल गांधी यांनी ऐतिहासिक चारमिनारवर तिरंगा फडकवला.
तर दुसरीकडे, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पक्षावर राहुल गांधींनी केलेल्या टिप्पणीमुळे त्यांच्या राज्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, राहुल गाधींनी आधी आपल्या लोकांचा विश्वास जिंकावा.
राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राधिका वेमुला यांनीही ट्विट केले आहे, त्यांनी त्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांच्या सोबतचा प्रवास सांगत त्यांनी भाजप-आरएसएसच्या हल्ल्यापासून संविधान वाचवा आणि रोहित वेमुलाला न्याय द्या अशी मागणीही त्यांनी केली.
रोहित वेमुलाच्या आईबद्दल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राधिका वेमुला यांचे ‘भारत जोडो यात्रे’तील फोटो शेअर केले आहेत.
रोहित वेमुला यांच्या आत्महत्येनंतर उच्च शिक्षण संस्थांमधील जातिवादाच्या विरोधात देशभर चळवळ उभा राहिली होती. आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून आता पुढे भारत जोडी यात्रा पुढे जात आहे.