मनसे पनवेल तालुका चषक २०२३ क्रिकेट स्पर्धा येथील रीठघर येथे उत्साहात संपन्न…

0
101

पनवेल दि १४ : (विठ्ठल ममताबादे )मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने मनसे पनवेल तालुका चषक २०२३ दिनांक ९/०२/२०२३ ते १२/०२/२०२३ या कालावधीत राजुदादा पाटील,मनसे नेते आमदार कल्याण ग्रामीण यांच्या उपस्थितीत तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भाई पाटील,मुनाफ ठाकूर चित्रपट सेना उपाध्यक्ष मनसे आणि आयोजक रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका येथील रीठघर येथे उत्साहात संपन्न झाली.

सदर भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेला मनसे नेते,माजी आमदार नितीनजी सरदेसाई यांनी देखील स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपस्थिती लावली होती.
मनसे नेते तथा आमदार राजू दादा पाटील यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या पनवेल तालुका कार्यालयाला भेट देऊन भव्य पक्षप्रवेश घेण्यात आला. कार्यालया बाहेरील राजुदादा यांचे भव्यदिव्य स्वागत आणि सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची आणि जनतेची गर्दी याने जणू वातावरण मनसेमय झालं होते .मनसेच्या जयघोषाने आणि लोकप्रिय आमदारांच्या येण्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहवर्धक वातावरण आणि मनसे पक्ष वाढीसाठी खूप मोठी ऊर्जा मिळेल अशी आशा तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांनी व्यक्त केली.तसेच लोकप्रिय आमदार राजू दादा पाटील तसेच जितेंद्र पाटील रायगड जिल्हाध्यक्ष मुनाफ ठाकूर चित्रपट सेना उपाध्यक्ष हर्षल भाई पाटील राजू दादा पाटील यांचे सहकारी मित्र यांच्या उपस्थिती करिता आणि सह आयोजक गुरू भोपी आणि सर्व मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांचे रामदासभाई पाटील यांनी आभार व्यक्त केले.यापुढेही अशीच स्पर्धा आणि कार्यक्रम करून पक्ष संघटना वाढीकरिता आणि पक्ष प्रसाराकरिता हातभार लावू अशी ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here