उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जिल्हाप्रमुख संजू परब यांचा मोठा धक्का..

0
10

श्री परब यांच्या उपस्थितीत सोनू दळवींचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी,दि.२६: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मोठा धक्का दिला आहे. आंबोली जिल्हापरिषद गट आणि विलवडे पंचायत समिती गणातील ठाकरे गटाचे खंबीर पदाधिकारी सोनू दळवी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे परिसरात शिवसेनेचे बळ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

यावेळी सोनू दळवी यांच्यासोबत विलवडे, कोनशी, सरमळे तसेच अन्य गावांतील त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हातावर शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत तालुकाप्रमुख दिनेश गावडे, राघोजी सावंत, सातोळी सरपंच सोनाली परब, देवसू गावचे मानकरी मंताजी सावंत, पारपोली सरपंच संदेश गुरव आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

सोनू दळवींसारख्या तळागाळातील नेत्याने पक्षात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाची या भागातील पकड ढिली झाली असून, आगामी काळात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संजू परब यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here