सावंतवाडी,दि.१९: दि सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांत सुवर्णपदके पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून संपूर्ण जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
विज्ञान ऑलिंपियाड परीक्षेत इयत्ता सहावीचा कॅडेट अथर्व मोहिते, तसेच इयत्ता सातवीचे कॅडेट महादेव जाधव, कॅडेट शेवन परेरा आणि कॅडेट स्वराज पारकर यांनी सुवर्णपदक पटकावले. गणित ऑलिंपियाडमध्ये इयत्ता सहावीतून कॅडेट अथर्व मोहिते, कॅडेट वेद बेळणेकर, कार्तिक साइल; इयत्ता सातवीतून मधुस्पर्श कदम, सर्वेश गावडे, स्वराज पारकर; इयत्ता आठवीतून कॅडेट द्विज खानोलकर, यज्ञेश डेगवेकर तर इयत्ता नववीतून श्रीदत्त मेंगडे, ओम निकम आणि रुद्र शेट्ये यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. विशेष म्हणजे, कॅडेट श्रीदत्त मेंगडे याची दुसऱ्या स्तरावरील (लेव्हल २) परीक्षेसाठी निवड झाली आहे.
इंग्रजी ऑलिंपियाडमध्येही विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडली. यामध्ये इयत्ता सहावीचे कॅडेट अथर्व राठोड, अथर्व मोहिते आणि कॅडेट वेद बेळणेकर यांनी सुवर्णपदक पटकावले. इयत्ता सातवीतून तनुष राऊत, सर्वेश गावडे; इयत्ता आठवीतून चैतन्य पवार, तनिष्क मोरे, आरुष कोरगावकर तर इयत्ता नववीतून दुर्वेश बागवे, मिहिर सावंत आणि दक्ष शेडगे यांनी सुवर्णपदक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.
या सर्व विद्यार्थ्यांना सैनिक स्कूलच्या तज्ज्ञ शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे, सर्व संचालक आणि पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



