शिंदेंसह पक्षातून फुटलेल्या 40 आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पावरफुल प्लान

0
148

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला. 40 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार रातोरात कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतारा व्हावे लागले. यानंतर राज्यात नवे शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. तेव्हापासूनच शिंदे विरुद्ध ठाकरे असा नवा सत्ता राज्याच्या राजकारणात सुरु झाला आहे. येत्या काळात हा सत्ता संघर्ष आणखी पेटणार आहे. शिंदेंसह पक्षातून फुटलेल्या 40 आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पावरफुल प्लान बनवला आहे.

शिंदेंसह 40 आमदारांना शह देण्यासाठी ठाकरेंनी नवी रणनीती आखली आहे. शिंदेंसह 40 आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत.

उद्धव ठाकरे लोकसभा, विधानसभा, स्थानिक निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरेंनी उमेदवारीसाठी पदाधिकाऱ्यांची आतापासूनच चाचपणी सुरु केली आहे.

याचाच एक भाग म्हणून संजय राठोड यांना शह देण्यासाठी ठाकरे गट संजय देशमुख यांना पुढे करणार आहे. अशाच प्रकारे अन्य जिह्यातही बंडखोर आमदारांना तोडीस तोड देण्यासाठी तगड्या नेत्यांना ठाकरे पुढे करमार आहेत.

पक्षातून फुटलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे रणनीती आखत आहेत. या शिवाय सुप्रीम कोर्टातील लढाई जिंकण्यासाठी देखील ठाकरे गटाने कंबर कसली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पक्षाला बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. तर, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील चांगलेच सक्रिय झाले आहेत.

आदित्य ठाकरे देखील सातत्याने आक्रमक भूमिका मांडत आहेत. ठाकरे पिता-पुत्र दौरे करत शिवसेनेची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here