पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मुख्यमंत्री देवाभाऊ, प्रदेशाध्यक्ष रविदादा यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास; निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठे बळ..!
सावंतवाडी,दि.२२: सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) अत्यंत सकारात्मक घटना घडत आहेत. देशात भाजपामध्ये असलेल्या उत्साहाच्या वातावरणाचा प्रभाव आता सावंतवाडीच्या दुरदूर्गम भागापर्यंत पोहोचला आहे. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, खासदार नारायणराव राणे, आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाचा करिष्मा कोकणात आणि विशेषतः सावंतवाडीत चांगलाच जाणवू लागला आहे.

या नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरासह सावंतवाडीतही भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी सावंतवाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्सुक आहेत. भाजप महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांच्या कुशल सुसंवादाच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश लाभले असून, एका पाठोपाठ एक असे मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत.
आजही विविध पक्ष आणि संघटनांचे शेकडो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेशकर्ते झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोठ्या संख्येने मुस्लिम बंधू-भगिनींना भाजपामध्ये आणण्याची किमया विशाल परब यांनी साधली आहे.

यावेळी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शिवा गावडे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर ,ज्ञानेश्वर पारधी, पूजा गावडे, श्याम सावंत, संचिता गावडे, सेजल पेडणेकर, संदीप नाईक, धीरज गावडे, खतिजा रेडकर, सिरीन बाडीवाले, आईसा रेडकर, रेहाना बाडीवाले, नुजार मुला, साईनाज मुला, साइड फिरझाडे, आयन शेख, जियान मेमन, आफ्ताब शेख, फाड खाजा, मिझान मुला, मुस्तफा नासिपुरी, उभेद काजी, आरहन बाडीवाले, आफाण बाडीवाले, रेहान शेख, प्राणिता सावंत, वैशाली राऊत, अर्पिता सावंत, मनीषा गावडे, कल्पना सावंत, मानसी राणे, अमिता रेमुळकर, कविता गंगावळकर, छाया कडू, संगीत पारधी, दिशा सावंत, आशा गावडे, भाग्यश्री भराडी, साक्षी तळवणेकर, शरद सावंत, सुहासिनी शेट्टे, सुमित्रा परब, साक्षी सावंत, लता गावडे, सोनाक्षी तेजम, यशश्री तळवणेकर, गौरेश गावडे, संगीता परब, जीवन कडू, सायली गावडे, सानिया तळवणेकर, मानसी पाटील, अंकिता सावंत, मनोहर पाटील, रंजना कारेकर, तृप्ती सावंत, लक्ष्मण भुते, निलया बदिरे या मान्यवरांसह त्यांच्या सोबत शेकडो सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
सावंतवाडी नगरपरिषदेत ‘कमळ’ फुलविण्याचा पक्का निर्धार भाजपकडून झाल्याचे चित्र आता दिवसेंदिवस अधिकच ठळक होत आहे. राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या मतानूसार, बिहारमधील विजयाचा जल्लोष पुन्हा एकदा सावंतवाडीतही होण्याची शक्यता आहे.






