नगरपरिषद निवडणुकीपूर्वी विरोधकांना मोठा धक्का! खासकीलवाडा, चितारआळीतील शेकडो जणांचा भाजपमध्ये प्रवेश

0
23

सावंतवाडी,दि.२० : शहरातील खासकीलवाडा व चितारआळी येथील शेकडो जणांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे.

भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. भाजप युवा नेते विशाल परब व सौ. वेदीका परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला. खासकीलवाडा येथील अनिल होडावडेकर, राजू धारपवार, तुषार होडावडेकर, साईनाथ मांजरेकर, जॅक्सन डिसोझा, अमित होडावडेकर तसेच चिताराळी येथील रोशन गोसावी, समीर लाड, ओंकार ढवळे, गणेश मिरजकर, आदित्य सावंत आदी शेकडो जणांनी भाजपात प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, प्रमोद कामत, उदय नाईक, समृद्धी विर्नोडकर, मधूकर देसाई, विनेश गवस, प्रा. केदार म्हसकर, बंटी जामदार, हितेन नाईक, केतन आजगावकर, धिरेंद्र म्हापसेकर आदी भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here