शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सीमा मठकर यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश..

0
20

सावंतवाडी,दि.१३: माजी खासदार आणि उबाठा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे सौ. सीमा मठकर यांच्यासह अनेक समर्थकांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सावंतवाडीतील शिवसेनेच्या (उबाठा गट) कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचा विषय ठरला.
सीमा मठकर यांच्यासह आर्या सुभेदार, कृतिका कोरगावकर, नियाज शेख, तेजल कोरगावकर, माजी आत्माराम नाटेकर आदींनी यावेळी अधिकृतपणे उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे सावंतवाडी परिसरातील पक्षाच्या ताकदीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार विनायक राऊत,अरूण दुधवडकर,बाबुराव धुरी (जिल्हा प्रमुख)
जान्हवी सावंत,श्रेया परब (महिला जिल्हाप्रमुख),रूपेश राऊळ (विधानसभा प्रमुख),सुकन्या नरसुले
आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here