सावंतवाडी,दि.०३ : तालुक्यातील माडखोल ग्रामपंचायतीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायतीच्या तीन विद्यमान सदस्यांसह आणि दोन माजी सदस्यांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे माडखोल परिसरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
सौ. सरिता बाळकृष्ण राऊळ,सौ. दिप्ती दिपक राऊळ,सौ. प्रज्ञा उल्हास राणे, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि माजी विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक आत्माराम शांताराम लातये, उल्हास राणे या सर्व सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, अशोक माळकर आणि मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ,माजी सरपंच राजन राऊळ, बाळु शिरसाट, अनिता अनिल राऊळ, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भाऊ कोळमेकर, कैलास ठाकूर, तसेच माजी उपसरपंच सुरेश आडेलकर, अनिल परब, बूथ अध्यक्ष संतोष तेली, शैलेश राऊळ, सिद्धेश शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते लखन आडेलकर, विष्णू (बाबु) राऊळ, विकास म्हाडेश्वर आदी ग्रामस्थांचा समावेश होता.
या प्रवेशामुळे माडखोल ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे बळ वाढले असून आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे पक्षबदल महत्त्वाचे मानले जात आहेत. भाजपच्या नेत्यांनी या सर्व नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



