कलंबिस्त पंचायत समिती सदस्य पदासाठी रविंद्र तावडे इच्छुक

0
44

सावंतवाडी,दि.०१ : तालुक्यातील कलंबिस्त पंचायत समिती सदस्य पदासाठी कलंबिस्त गावचे युवा, तडफदार नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र गजानन तावडे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. ते लवकरच आपली उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

रविंद्र तावडे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे कलंबिस्त पंचक्रोशीत “रक्तदाता” आणि “रक्तप्रेमी” म्हणून ओळखले जातात.

श्री तावडे यांनी कलंबिस्त पंचक्रोशीत नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताविषयीच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. तसेच, गोवा, बेळगाव आणि इतर ठिकाणीही कोणत्याही गरजू रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आल्यास ते तातडीने धाव घेऊन रक्तदान करतात.

ते जनतेच्या सुख-दुःखात धावून जातात आणि गरजू लोकांना आर्थिक मदतीचा हात देतात.

कलंबिस्त पंचक्रोशीतील वीज समस्या, रस्ते समस्या आणि नेटवर्क समस्या यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे.

त्यांनी प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने बोलून त्यांनी आपली समाजसेवेची वाटचाल अविरतपणे सुरू ठेवली आहे.

पंचायत समिती निवडणुकीसाठी जो पक्ष त्यांना उमेदवारी देईल, त्या पक्षासोबत राहून निवडणूक लढवण्याची इच्छा तावडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांच्या पाठीशी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तसेच थोरा-मोठ्यांसोबतही त्यांचे मतदारसंघात चांगले संबंध आहेत.

सध्या तरी रविंद्र तावडे हे पंचायत समिती निवडणूक लढवण्यास उत्सुक असून, भविष्यात ते कोणता निर्णय घेतात याकडे कलंबिस्त पंचक्रोशीतील युवा वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here