शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश.. ॲड. सायली दुभाषी
सावंतवाडी,दि.१३: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सावंतवाडीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठे खिंडार पाडले आहे. दोन्ही पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.

जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्क, मितभाषी स्वभाव आणि सहकार्याच्या वृत्तीमुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते शिंदे गटाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी शहरातील झिरंगवाडी भागातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे सेनेची वाट धरली.
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, सचिव परीक्षित मांजरेकर, युवा सेनेचे शहराध्यक्ष अर्चित पोकळे, कोलगाव शाखाप्रमुख गौरव कुडाळकर, समीर पालव आणि शिवसेना व युवा सेनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या धडाडीच्या महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी आणि अल्पसंख्यांक शहराध्यक्ष ॲड. राबिया शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष झहूर खान, तालुकाध्यक्ष इलियास आगा, तालुका उपाध्यक्ष तौसिफ आगा, सरचिटणीस सोहेल शेख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षबदल केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार): ॲड. सायली दुभाषी, ॲड. राबिया शेख, झहूर खान, इलियास आगा, तौसिफ आगा, सोहेल शेख, फिरोज खान, आरिफ खान, शौकत बेग, अनिस शेख, अझहर रेशमी, रियाज अत्तार, रमजान नाईकवाडी, वाजीद खान, शहाबाद आगा, मंगेश घाडीगावकर, पापा ऐन्नी, रुकसाना खान, काशिनाथ दुभाषी, साजिदा फिरोज खान, श्रावणी श्रीकांत कोरगावकर, श्रीकांत कोरगावकर, गणेश निंबाळकर, सिद्धी नागेश निंबाळकर, तैमीन तहसीलदार, फिरदोस जहूर खान, नंदिनी वेंगुर्लेकर, अलका अर्जुन नाईक, महेक महंमद खान, शहनाज आरिफ खान, अमृता अनिल नाईक, सकीना वाजिद खान, फातिमा अहमद खान, जिलेखा आयुब खान, नुसरत असिफ खान, रिदा अझहर रेशमी, हसीना पापा ऐन्नी, फरदीन शेख, वाहिदा शौकत बेग, झेबा नाईक, अनुष्का मातोंडकर, शेवंती घाडीगावकर, फैजा खान यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे सावंतवाडी शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा शिंदे गटाला निश्चित फायदा होईल, असा विश्वास राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.



