पनवेल,दि.३ : सेवा क्षेत्रात विश्वासार्ह नाव असलेल्या ‘लक्ष्मण घाडी ग्रुप’च्या नवीन पनवेल येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर, गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या रायगड जिल्हा प्रवक्त्या आणि प्रसिद्ध शिवव्याख्यात्या श्रीमती सुवर्णा दादाभाऊ वाळुंज यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी श्रीमती सुवर्णा वाळुंज यांनी फीत कापून आणि श्रीफळ वाढवून कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यांनी ‘लक्ष्मण घाडी ग्रुप’च्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या, “सेवा क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणे ही काळाची गरज आहे. लक्ष्मण घाडी ग्रुप आपल्या विश्वासार्ह सेवेने पनवेल आणि नवी मुंबई परिसरात नक्कीच नाव लौकिक मिळवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना (उबाठा) नवी मुंबई उप शहर प्रमुख दीपक दळवी, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, बळीराज सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रकाश चांदिवडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान सर्वांनी ग्रुपच्या नवीन उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या नवीन कार्यालयामुळे नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना मनुष्यबळ पुरवठा सेवेसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.




