आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या महीला जिल्हाध्यक्षा मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य..
कुडाळ,दि.०५: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा सौ मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल मंगळवारी कुडाळ येथील कातकरी समाज महिलां सोबत हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला.
अतिशय भयावह अशा वास्तव्यास असलेल्या कातकरी समाजातील महिलांच्या वेदना कमी करून त्यांना किमान एका दिवसासाठी तरी चेहऱ्यावर हास्य आणावे या प्रांजळ उद्देशाने सौ.परब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ‘हळदी कुंकू समारंभ’ आयोजित करून आपल्या मानवाला मानव मानून माणुसकीचा केंद्रबिंदू मानत आपला वाढदिवस कातकरी भगिनींच्या सानिध्यात राहून त्यांना हळदी-कुंकू समारंभ आयोजित करून आपला वाढदिवस अतिशय आगळे वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजाध्ये एक वेगळी छाप सोडली आहे.
खरंतर हा केवळ वाढदिवस किंवा हळदी कुंकू समारंभ नव्हता तर होता एक माणुसकीचा आणि माणसात राहून माणसाला माणसासारखे वागवण्याचा प्रयत्न.! यानिमित्ताने मानसी परब यांनी आपल्या वागण्यातून एक आदर्श तर निर्माण केलाच शिवाय अलीकडच्या काळात छोट्याशा सुखाने अतिशय गगनविहार करणाऱ्या व्यक्तींसाठी आदर्श असा संस्कार आणि संदेश बहाल केला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष आनंद कांडरकर,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा.रुपेश पाटील, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्र खानोलकर, कुडाळ महिला तालुकाध्यक्ष सौ. दीक्षा सावंत, सदस्य साबाजी परब, सदस्य सौ. सायली रेगे, सदस्य गौतम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.