शिरशिंगे येथील सैनिक भवनाच्या नूतन वास्तूचा २६ जानेवारी रोजी उद्घाटन सोहळा..

0
57

सावंतवाडी,दि.२४: तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायत हद्दीत माजी सैनिकांसाठी बांधण्यात आलेल्या “सैनिक भवन” या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा येत्या रविवारी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी होत आहे.
या वास्तूच्या उद्घाटनासाठी राज्याचे माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे.. सकाळी आठ(८ वाजून ३०) मिनिटांनी झेंडावंदन व स्फूर्ती गीत, सकाळी १०.३० वाजता प्रमुख पाहुण्यांचे आगमन व सैनिक भवन उद्घाटन समारंभ, स.१०.४५ वा. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, ११.००वा. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व श्रद्धांजली, ११.१५ वा. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार, ११.३० वा निवृत्त माजी सैनिक व ग्रामस्थांचा सत्कार, दुपारी १२.०० वा प्रमुख पाहुण्यांचे भाषण दु.१२.३० आभार प्रदर्शन, दु.१.००पासून स्नेहभोजन असा भरगच्च कार्यक्रम माजी सैनिक संघटना पदाधिकारी व शिरशिंगे ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आला आहे.
तरी या कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व हितचिंतकानी उपस्थित रहावे असे आवाहन माजी सैनिक संघटना अध्यक्ष नारायण राऊळ, उपाध्यक्ष मनाजी घावरे, सचिव दीपक शिर्के, खजिनदार यशवंत राऊळ, व गावचे सरपंच माजी सैनिक दीपक राऊळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here